प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका…’!

83

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणूक नुकतीच झाली. आता या निवडणुकीत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्व 21 जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपाच्या सर्व 17 जागा बिनविरोध आल्या होत्या, उरलेल्या 4 जागांची मतमोजणी नुकतीच झाली. या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. आता भाजपाच्या या विजयावर ट्विट करत, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

असे आहे ट्वीट!

भाजपाने या निवडणुकीत सर्वच २१ जागा जिंकल्या. मतदारांनी बॅंकेच्या कारभारावर विश्वास दर्शवला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

( हेही वाचा: राज्यातील परीक्षांचा सावळा गोंधळ! एकाच दिवशी होणार ‘या’ दोन्ही परीक्षा )

भाजपा विजयी

मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.