कमरेखालचे वार करून उद्धव ठाकरे यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ते जे बोलत आहेत, तो आरोपपत्राचा भाग आहे. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे; तरीही तुम्ही शितोंडे उडवण्याचा प्रयत्न केलात. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार आहे. म्हणूनच तुमची तंतरली आहे, अशी टीका प्रदेश भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. वेगळी कोणतीही आसनं तुम्हाला झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, योगा डे…’, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचा – पहिल्याच पावसात शिवाजीपार्क मैदान तलावसदृश्य)
ठाकरेंच्या टीकेला चित्रा वाघ यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. ‘तुम्ही नक्कीच आत्मचरित्र लिहायला हवं… त्यात खालील घोटाळे कसे केले त्यावरही लिहा… म्हणजे मराठी माणसाला तुम्ही कसं लुटलं ते ही कळेल… आणि हो, लवकरच ज्या आसनाची गरज तुम्हाला लागणार आहे ते शवासन ही शिकून घ्या उद्धवजी…. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है..
हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलयं जे तुम्ही आणि तुमच्या बगलबच्च्यांनी पाहील आहेचं… म्हणून सांगतोय, आमच्या देवेंद्रजींच्या नादी लागू नका, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community