शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या ‘त्या’ विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित विधानावर महाराष्ट्राचा मणिपूर होणार. अशी बिनबुडाची वक्तव्ये करून ‘फेक नॅरेटिव्ह’ (Fake Narrative) पसरवणारी ‘महा बिघाडी’ (Maha Bighadi) मध्ये एक फळी निर्माण झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. तसेच या संदर्भात पुड्या सोडणाऱ्यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावे, असे आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केले.
या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील नेत्यांवर निशाणा साधला. वास्तविक महाराष्ट्रातही मणिपूर सारखा हिंसाचार होण्याची चिंता वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांच्या वतीने अशा पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाल्या चित्रा वाघ
या संदर्भात चित्रा वाघ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘पुड्या सोडणार्यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावेत ! महाराष्ट्रात जातीय तणाव आहे, मराठा आणि ओबीसी यांच्यात धुसफूस सुरू आहे, सगळीकडे दंगली भडकतील, महाराष्ट्राचा मणिपूर होणार.. अशी बिनबुडाची वक्तव्ये करून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणारी ‘महा बिघाडी’ मध्ये एक फळी निर्माण झाली आहे. असे बोलणाऱ्यांनी सरकारला या केलेल्या वक्तव्यासंदर्भातील पुरावे तात्काळ द्यावेत, असे वाटते. महाराष्ट्र शांत आहे, गृहमंत्री सक्षम आहेत, पण ते बघवत नसणारे अशा पुड्या सोडत आहेत, त्यांच्याकडून सरकारने ताबडतोब पुरावे मागावेत, अशी शांतताप्रेमींची मागणी आहे.
(हेही वाचा – राज्यात जातीय दंगल पेटणार, असे भाकीत करणे चुकीचे; संजय शिरसाट यांचा Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल)
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले होते की, मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झाले आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावे असे वाटले नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये कर्नाटकातही घडले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असे काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपले राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिले आहे. असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community