भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेसची खोटी खटाखट वचनं नव्हे; Chitra Wagh यांची टीका

81
भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेसची खोटी खटाखट वचनं नव्हे; Chitra Wagh यांची टीका
भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेसची खोटी खटाखट वचनं नव्हे; Chitra Wagh यांची टीका

भाजपाचे संकल्प पत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावरून वेगवान वाटचाल करण्यासाठी आखलेली योजना आहे. या संकल्प पत्रात सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास याची खूनगाठ मनाशी बांधलेल्या भाजप आणि महायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदाचा डॉक्युमेंट नाही. काँग्रेसच्या खोट्या फॅक्टरी सारखी खटाखट खोटी वचनं नाही. तर आमच्यासाठी संकल्पपत्र म्हणजे एक पवित्र डॉक्युमेंट आहे जे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला प्रगतशील बनवेल, असे विधान चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले आहे. (Chitra Wagh)

( हेही वाचा : मिसेस इंडिया गॅलेक्सी Rinima Borah देखील Love Jihad ची ठरलेली बळी; जबरदस्तीने धर्मांतर, गोमांस खायला दिले, मारहाणही केली

तसेच योजनांबद्दल वाघ म्हणाल्या की, प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर आमच्या लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपयांचा निधी, म्हणजे वर्षाला २५,२०० रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तसेच २०२७ पर्यंत ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवणार, ५०० बचतगटांसाठी १ हजार कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार आहे, असे विधान भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. (Chitra Wagh)

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, भाजपाच्या संकल्प पत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ १२ हजार ऐवजी १५ हजार मिळणार आणि MSP वर २०% अनुदान देणार आहे. तसेच राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार, वीज बिलात ३०% कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार, वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान, महिन्याला २१०० म्हणजेच वर्षाला २५ हजारांचा आधार मिळणार, १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार १० हजार रुपये विद्यावेतन आणि २५ लाख रोजगार निर्मिती करणार, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार १० लाख उद्योजक, सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @२०२८’ सादर करण्यात येईल, असे ही वाघ (Chitra Wagh)म्हणाल्या. (Chitra Wagh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.