औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर फिरणार म्हणून काँग्रेसचे…; Chitra Wagh यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका

54
औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर फिरणार म्हणून काँग्रेसचे...; Chitra Wagh यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका
औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर फिरणार म्हणून काँग्रेसचे...; Chitra Wagh यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका

क्रूरकर्मा औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर बुलडोझर फिरणार की काय? या भीतीने काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांचे धाबे दणाणलेले दिसतात. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खुश करण्याच्या उद्देशाने अलीकडेच दिल्लीतून थेट महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलेच अकलेचे तारे तोडलेत, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा समाचार घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal ) यांनी औरंगजेबाची तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी (Devendra Fadnavis) केल्याने भाजपा नेत्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

( हेही वाचा : लेक्स फ्रिडमॅनसोबतच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi यांनी RSS विषयी व्यक्त केली कृतज्ञता; म्हणाले, ‘संघाने मला संस्कार आणि आयुष्याला दिशा दिली’)

ज्यांच्या रगारगातून रक्ताच्या प्रत्येक थेंबातून शिवरायांचे विचार वाहतात अशा आमच्या देवा भाऊंची तुलना या अविचारी आणि काँग्रेसी (Congress) नेत्यानं औरंगजेबाशी केली आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचा अपमान केला. खरी औरंगी वृत्ती तुमच्या नेत्यांच्या डोक्यात भरलेली आहे. नेहरूंपासून ते राहुल गांधींपर्यंत प्रत्येकालाच आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी वावडं आहे. आणि तुमचं हे बेताल बोलणे म्हणजे औरंग्याच्या कबरीची पाठराखण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) काँग्रेसवर केली.

तसेच वाघ पुढे म्हणाल्या की, हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal ) यांनी दिल्लीतल्या राहुल्लाला खुश करायला एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तावर आणि मावळ्यावर लांछन उडवलं तर महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा दाखवेल. खरं तर निवडणुकांमधून जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवलीच आहे. त्यातून तरी धडा घ्या नाहीतर काँग्रेसचे नाव इतिहासजमा होईल हे नक्की, अशा शब्दात कठोर टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.