वक्फ सुधारणा विधेयकावरुन (Waqf Amendment Bill) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली. वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) दि. २ एप्रिलला संसदेत मांडले जात आहे. त्यात उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांना वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली. (Chitra Wagh)
( हेही वाचा : मंत्री Nitesh Rane यांची हिंदुत्वाच्या मुद्यावरून राऊतांवर टीका; म्हणाले, तुम्ही गोधडी..तेव्हा देवेंद्र फडणवीस…)
त्यावर आता भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाघ म्हणाल्या की, ऐकलतं का सगळ्यांनी..सर्वज्ञानी रडत रौत स्वयंघोषित विश्वगुरु म्हणतात की वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबंध नाही. पण जेव्हा मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला. रडत रौत जी….महाराजांच्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होते तेव्हा हिंदुत्वाला (Hindutva) धक्का पोहचतो. हिंदू (Hindu) मंदिरे वक्फ होतात तेव्हा हिंदुत्वाला धक्का पोहचतो. इथे फक्त हिंदुत्व नाही तर राष्ट्रीयत्वला धक्का पोहचतो. पण तुम्हाला सत्तेची खाज सुटली आहे म्हणून इंदिरा गांधींचे गोडवे गात आहात…? त्यात हिंदूहृदयसम्राट यांचा साधा उल्लेखही तुमच्या ट्विट मध्ये नाही यातच सगळं आले. आज मी तुम्हाला विचारते बाळासाहेबांच्या संस्कारांना जागत तुम्ही वक्फ बोर्ड सुधारित बिलाच्या बाजूने मत देणार आहात का…? आहे का तुमच्यात हा दम…? बोला, असा सवालही वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.
राऊतांनी काय ट्विट केले!
वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill) पाठिंबा आहे की विरोध? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “आमची ठरलेली भूमिका तुम्हाला शेवटच्या क्षणी दिसेल. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावर करायच्या असतात, त्या आम्ही करु. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा (Hindutva) काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला ।’”, असा इशारा राऊतांनी दिला होता. (Chitra Wagh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community