उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. विधायक कामात टांग अडवून त्या कामाला नाट लावणारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट असल्याची टीका देखील वाघ यांनी केली आहे. राज्यातील उद्योग त्यांनी दिशाभूल केल्याने बाहेर जात असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. (Chitra Wagh)
या संदर्भात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एका पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut), उद्धव ठाकरेंवर कडक शब्दात टीका केली आहे. वाढवण बंदर आणि नाणार प्रकल्पाचा उल्लेख देखील चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. जनतेची दिशाभूल करून तुम्ही खोडा घालण्याचे काम केले असल्याचा आरोप देखील चित्रा वाघ यांनी केला आहे. (Chitra Wagh)
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या ?
अहो सर्वज्ञानी….@rautsanjay61
तुमच्या लेखी उद्योजकांकडून वसुली हाच फक्त महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे आणि शाखाप्रमुखाच्या आशिर्वादाने कोकण-मुंबईतल्या मराठी माणसाला वडापावची गाडी लावून देणे, ही तुमची रोजगाराची व्याख्या..!
त्यामुळेच वाढवण बंदरासारखा १० लाख…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 20, 2024
या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘अहो सर्वज्ञानी… संजय राऊत तुमच्या लेखी उद्योजकांकडून वसुली हाच फक्त महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे आणि शाखाप्रमुखाच्या आशिर्वादाने कोकण-मुंबईतल्या मराठी माणसाला वडापावची गाडी लावून देणे, ही तुमची रोजगाराची व्याख्या..!’ (Chitra Wagh)
उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर
‘त्यामुळेच वाढवण बंदरासारखा १० लाख रोजगारनिर्मिती करणाऱ्या आणि तब्बल ७६ हजार २२० कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या महाकाय प्रकल्पातून कोकणासह महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा प्रकल्प आकाराला येत असलेला पाहून तुमच्या पोटात दुखणारच… नाणारसारख्या प्रकल्पातही कोकणी जनतेची दिशाभूल करून तुम्ही खोडा घालण्याचं काम चालवलंय तेही यामुळेच…वर उद्योग राज्याबाहेर चालल्याचा कांगावाही तुम्हीच करायचा… विधायक कामात टांग अडवून त्या कामाला नाट लावणारे तुम्ही उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर आहात.’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. (Chitra Wagh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community