दिल्लीच्या निकालावर Chitra Wagh यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक; ट्विट करत म्हणाल्या …

75
दिल्लीच्या निकालावर Chitra Wagh यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक; ट्विट करत म्हणाल्या ...
दिल्लीच्या निकालावर Chitra Wagh यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक; ट्विट करत म्हणाल्या ...

दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुकीचे निकाल (Delhi Assembly Election Result 2025) जाहीर होत आहेत. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. (Chitra Wagh)

हेही वाचा-Delhi Election मध्ये लाडक्या बहिणींची मते ठरली निर्णायक; भाजपाची ५० जागांवर आघाडी

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आकडेवाडीनुसार, 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपाचं (BJP) कमळ फुलणार आहे. मोदींच्या (PM Narendra Modi) उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा भाजपकडे जात आहे. यापार्श्वभुमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सोशल मिडीया पोस्ट करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा-Delhi Election Result 2025 प्राथमिक कल समोर; कोण आघाडीवर ?

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलं आहे की, जनता भाजपबरोबर आहे.”

“देशाने यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून स्वीकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही…” असं चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.