जनाब राऊत तुम्हाला नवाब मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, चित्रा वाघ यांचा आरोप

157

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची संजय राऊत पाठराखण करतात असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ? असा सवाल चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना केला आहे. एनसीबी (NCB)सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टारगेट करायचं, त्याच्यावर पर्सनल अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे. नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तान च्या विजयचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करणा-यांची डोकी फोडली जातात आणि तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नवाब मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचा आहे. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते. असे म्हणत चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टिका केली आहे.

महाराष्ट्रातील गंभीर विषयावर भाष्य नाही

कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाही, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होतोय, एम्पीएस्सीच्या (MPSC)तरूणांचं भविष्य अंधारात ढकललं जातं आहे. रोज राज्यातील लहान मुली महिला यांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. यासगळ्या विषयावरती आपल्याला भाष्य करायचे नाही आहे. असा घणाघात चित्रा वाघ यांनी राऊतांवर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.