शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं, ते सर्वच कुचकामी ठरले आहेत; कारण शरद पवार (Sharad Pawar) यांना या वयात देखील मैदानात उतरावे लागत आहे. मुळात बारामतीमध्ये अजित पवारांचं काम प्रचंड आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार निवडून येतील असा विश्वास आहे. अजित पवारांचे (Ajit Pawar) प्रचंड काम आहे, विकासकामाचा प्रचंड व्यासंग असलेले नेते म्हणून अजितदादांची ओळख आहे. त्यांनी बारामतीमध्ये केलेली विकासकामं आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे, असे वक्तव्य भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले आहे. त्या कोल्हापूर दौऱ्यावर असतांना प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत केंद्राने अध्यादेश काढावा)
ताईंना त्यांचे राजकीय करियर सावरायला लागत आहे
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, बारामतीच्या मोठ्या ताईंकडून होणाऱ्या वक्तव्यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं दिसत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप वाईट वाटते. शरद पवारांच्या भोवती आता असणारी फळी कुचकामी ठरली. या वयातसुद्धा नेत्याला मैदानात उतरावे लागते, जिल्ह्यामध्ये फिरावे लागते आणि तालुक्यामध्ये लक्ष घालावे लागते, यासारखं वाईट काही नसावे. शरद पवारांनी ज्यांना मोठे केले आणि त्यांच्या अवतीभवती असणारे सर्वच कुचकामी ठरले. एवढ्या मोठ्या ताईंना त्यांचे राजकीय करियर सावरायला लागत आहे, अशी टीका केली आहे.
यांच्या घराला आग; पण लक्ष भाजपकडे
जागावाटपावरून महाविकास आघाडीवर चित्रा वाघ यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, यांच्या घराला आग लागली पण महाविकास आघाडीचे लक्ष भाजपकडे आहे. आमची काळजी करू नका, आमचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रगल्भ आहेत. महाविकास आघाडीचे नेते काही बोलतायत, त्यात काही तथ्य नाही. जे होणार ते देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने करतील असा आम्हाला विश्वास आहे. रोज सकाळी यायचं आणि तुतारी वाजवायची, मीडिया हेच विरोधकांचे कुरुक्षेत्र झाले आहे. शब्दाचे पोकळ बाण सोडणे एवढंच त्यांचे काम आहे, असा टोला वाघ (Chitra Wagh) यांनी लगावला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community