भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा ट्वीटमध्ये केला. त्यानंतर गोव्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसून आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान सध्या देशभरात कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे तरीही गोव्यात कॉंग्रेसला खिंडार पडले आहे यावरून आता भाजपच्या चित्रा वाघांनी ट्वीट करत कॉंग्रेसनवर निशाणा साधला आहे.
( हेही वाचा : संप लांबणीवर; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत दहा दिवसांमध्ये निर्णय)
चित्रा वाघ यांचे ट्वीट
तिकडे राहुल गांधींची “भारत जोडो” यात्रा इकडे गोव्यात काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांची “भाजप जोडो” जत्रा असे ट्वीट करत चित्रा वाघांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
तिकडे राहुल गांधींची "भारत जोडो" यात्रा
इकडे गोव्यात काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांची "भाजप जोडो" जत्रा…
😁😁@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Goa @Dev_Fadnavis @DrPramodPSawant @CTRavi_BJP
https://t.co/x9SBV9CaNA— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 14, 2022
जुलै महिन्यातच कॉंग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. भाजप कॉंग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. त्यावेळी कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून मायकल लोबो यांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. आता कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली असून, भाजपात सामील होणा-या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. दिंगबर कामत हे कॉंग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात.
Join Our WhatsApp Community