Uddhav Thackeray : चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; म्हणाल्या…

138
“उद्धवजी…आमचे सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही, तसेच ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चाललीय आणि तुम्ही मात्र डबल इंजिनाची गाडी गाळात घातली…, तुम्ही सत्ता गमावल्याच्या दु:खाचे उट्टं काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खांदा वापरू नका, अशा शब्दात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. उद्धवजी…आमचे सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही. आमचे सरकारच रयतेचे कल्याण आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, त्यामुळेच ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चालली आहे आणि तुम्ही मात्र डबल इंजिनाची गाडी गाळात घातली…”आम्ही राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. म्हणून सुरूवातीला ४० तालुक्यांपुरती असलेली दुष्काळाची व्याप्ती तातडीने कार्यवाही करत आणखी काही तालुक्यांतील १०२१ महसुली मंडळांपर्यंत वाढवली…आताही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहे…तुम्ही सत्ता गमावल्याच्या दु:खाचे उट्टं काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खांदा वापरू नका…असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार? असा उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर चित्रा वाघ यांनी त्याला प्रत्युत्तर दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.