“टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज…” Chitra Wagh यांचा काँग्रेसवर निशाणा

186
बदलापूर प्रकरणावरुन Chitra Wagh यांचा महाविकास आघाडीवर प्रहार; म्हणाल्या...

टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज येतोय का तुम्हाला? असा खोचक सवाल उपस्थित करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. देशातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार असल्याची ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका जाहीरसभेतून दिली होती. त्याचसंदर्भातील एक व्हिडीओ चित्रा वाघ यांनी शेअर करत ट्विट केले आहे. (Chitra Wagh)

(हेही वाचा –NDA Meeting: एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू; काय म्हणाले खासदार?)

आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे की, “टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज येतोय का तुम्हाला..? राहुल गांधी तुम्ही गोर गरीब जनतेची फसवणूक करण्याचा वारसा बरोबर चालवत आहात… मोहब्बत की दुकान नावाची पाटी लावून भोळ्या भाबड्या जनतेला लुटण्याचा तुमचा धंदा पुन्हा एकदा उघड पडला. मोहब्बत नावाचा दुकान थाटून तुम्ही गोरगरीब माता भगिनींच्या विश्वासाचा सौदा केला आणि त्यांना फसवलं…”, असे चित्रा वाघ म्हणाल्या. (Chitra Wagh)

(हेही वाचा –T20 World Cup, Ind vs Pak : या विश्वचषकात रिषभ पंतच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज )

पुढे त्यांनी (Chitra Wagh) म्हटले आहे की, “तुम्हाला माफी नक्कीच नाही. पण राहुल गांधी या माता-भगिनींच्या मागे भक्कमपणे त्यांचा बाप उभा आहे जो प्रेमाचा सौदा करत नाही मात्र न मागता, न सांगता बापाचं कर्तव्य बजावतो त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी.. त्यामुळेच तुमचं मोहब्बत नावाच दुकान लवकरच बंद होणार आहे आणि नाही झालं तर ते आम्ही करू आमच्या माता भगिनींसाठी… कारण कसा आहे ना…. जनाब मोहब्बत दूकानों में नहीं मिलती और मोहब्बत की सौदेबाजी भी नहीं होती…”, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. (Chitra Wagh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.