गोवा तो झांकी है, राजस्थान, छत्तीसगढ़ बाकी है। चित्रा वाघ यांचे ट्विट

184
कर्नाटक, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी केल्यानंतर भाजपाने गोव्यामध्ये ऑपरेशन लोटससाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. गोव्यातील काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी १० आमदार भाजपामध्ये सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ‘गोवा तो झांकी है राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।’, अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे भाजपाचे पुढील लक्ष्य राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये असतील, असे संकेत दिले आहेत.

गोव्यात काँग्रेस सावधान पवित्र्यात  

गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली आहे. या राज्यातून ११ पैकी १० काँग्रेसचे मदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून कोणत्याही क्षणी १० आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीतून धडा घेत काँग्रेस हायकमांडने गोव्यातील आमदारांना अज्ञातस्थळी हलवले आहे. यावरून भाजपाच्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. चित्रा वाघ यांनी ‘गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।, असा इशाराही ट्वीट मधून दिला आहे. काँग्रेसचे मुकुल वासनिक गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने दाखल झाले. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो तसेच काँग्रेसचे अन्य नऊ आमदार मिळून एकूण दहा जण काँग्रेस विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती सांगण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.