‘मी काय बघते, यापेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, Chitra Wagh यांचा अंधारेंना सवाल

ठाकरे गटाने जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती.

205
'मी काय बघते, यापेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, Chitra Wagh यांचा अंधारेंना सवाल

राज्यात आगामी २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या लोकसभेची जय्यत तयारी सुरू असून, लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेवर जोर देताना दिसत आहेत. दरम्यान राज्याच्या राजकारणात एक नवा वाद समोर आला आहे. चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उबाठा गटाने केलेल्या जाहिरातीवर (UBT Advertisement) आरोप केले आहेत. यावेळी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (UBT Sushma Andhare) यांनी पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई पॉर्न बघत असतील, असे गंभीर आरोप चित्रा वाघ यांच्यावर केले. चित्रा वाघ यांना मी काय बघते, काय बघत नाही. यापेक्षा विचारलेला प्रश्न खरं आहे की खोटा ते सांगा उलट सवाल अंधारे यांना केला.

(हेही वाचा – Deepfake: निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर कराल, तर होणार कारवाई!)

मी काय बघते, काय बघत नाही…

मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा मी विचारलेला प्रश्न खरा आहे की खोटा ते सांगा, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच उबाठ्याच्या दिवट्यांवर बोलल्यानंतर अंधारातील सटरफटर चिलटं फडफडतात. मला काहीही बोला, पण तो ऍक्टर पॉर्न स्टार आहे की नाही ते सांगा, असं चित्रा वाघ यांनी सांगितले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे ज्यांच्या मांडीवर बसले त्यांचे सरकार कर्नाटकात आहे, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. 

सुषमा अंधारे काय म्हणाल्या ? 

चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर तिखट पलटवार केला आहे. भाजपाच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. सवयी प्रमाणे त्या बोलून गेल्या असतील असं देखील सुषमा अंधारे यांनी एका ट्वीटद्वारे चित्रा वाघ त्यांच्यावर पटलवार करताना म्हणाल्या.

(हेही वाचा – Bhalji Pendharkar : मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेणारे भालजी पेंढारकर)

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरातील सर्व राजरीय पक्ष विविध मुद्द्यांवर जाहिरात करत आहेत. उबाठा गटाकडूनही विविध जाहिराती सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधीत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याच जाहिरातीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराच्या संबंधीत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच अशा कलाकाराला जाहिरातीमध्ये घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदत घेत ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.