शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेना आणि शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गट यांचा मेळावा मुंबईत पार पडला. यातील शिवसेना उबाठाचा मेळावा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर तर, शिवसेना पक्षाचा मेळावा बीकेसी येथे पार पडला. यावेळी सभेत बुरसटलेले गोमुत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला सुनावले. यावरून भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर हल्लाबोल केला.
भाजपाच्या चित्रा वाघ यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ टाकला आहे. यामध्ये औरंगजेब फॅन क्लबचे (Aurangzeb Fan Club) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आता अचानक हिंदुत्व आठवले. ते पाहिजे तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावतात आणि एरवी तो खुंटीवर टांगवून ठेवतात, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत.
(हेही वाचा – अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर)
हिंदुत्व कुठे गेलं ?
- व्होट जिहाद करण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशीद उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेले होते हिंदुत्व?
- तुष्टीकरण करत उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या मान्य करताना कुठे गेले होते हिंदुत्व?
- पाकिस्तानी झेंडे डोळ्यासमोर नाचवले गेले, तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व?(हेही वाचा – Delhi Assembly Election च्या प्रचारासाठी दरपत्रक; ४० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा)
आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सूड घ्यायचा आहे. पण ते कोणाचा सूड घेणार आहेत जनतेचा? त्यांनी वारंवार गद्दार, खंजीर यासारखी भाषणे करत तसेच रोज सकाळी माध्यमांवर आपल्या भोंग्याला (खासदार संजय राऊत) सोडणे हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे, असा पलटवारही त्यांनी केला आहे. तसेच वक्फ बोर्डाला (Waqf Board) विरोध करायच म्हटले तर मूग गिळून गप्प राहिले आणि जेव्हा जनता त्यांच्याविरोधात कौल देते तेव्हा जनतेचा कौल अमान्य करायचा, ही उद्धव ठाकरे यांची जुनी खोड आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community