हिंदुत्व सोडून संजय राऊत यांच्या नादी लागणे केवढ्याला पडले; Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

81
हिंदुत्व सोडून संजय राऊत यांच्या नादी लागणे केवढ्याला पडले; Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
हिंदुत्व सोडून संजय राऊत यांच्या नादी लागणे केवढ्याला पडले; Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजून तरी शहाणे व्हावे. असंगाशी संघ त्यांच्या अंगलट आला आहे. हिंदुत्व सोडून त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नादी लागणे, त्यांना केवढ्याला पडले, असा प्रश्न सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?)

ट्वीटमध्ये चित्रा राऊत यांनी म्हटले आहे की, अहो सर्वज्ञानी रडतरौत, तुमच्या असल्या घाणेरड्या विचारांना जनता पूर्णपणे कंटाळली आहे, हे आता तरी लक्षात घ्या. तोंडावर पडला.. पक्षाला तोंडावर पाडलं.. महाभकास बिघाडीला तोंडावर पाडलं.. अहो, सर्वज्ञांनी तुमच्या महाभकास बिघाडीच्या एकत्र आमदारांपेक्षा एकट्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आमदार जास्त येणार आहेत.. आता, तरी जनतेचा मान ठेवा.. बाष्कळ बडबड आता तरी बंद करा !

या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सर्वज्ञानी रडतरौतांची बौद्धिक कुवत किती आहे ? हे उद्धटपंत सोडून सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यामुळे पक्ष सोडून जण गेले, तरी उद्धटपंत त्यांना कवटाळून बसले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. उद्धटपंत, अजून तरी शहाणे व्हा. ‘असंगाशी संग’ अंगलट आला आहे. वंदनीय बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व सोडून या रडतरौताच्या नादी लागणं केवढ्याला पडलं बघा ?’

निकालात महायुतीने ऐतिहासिक आघाडी मिळवली आहे. बहुमतापेक्षा अधिकच्या जागा जिंकत राज्यात एक हाती सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आले आहे. एकट्या भारतीय जनता पक्षाने १३१ जागांवर आघाडी मिळवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.