सर्वसामान्यांना सिडकोकडून (Cidco) मोठा दिलासा मिळाला आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. सिडकोच्या (Cidco) अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा-Cyber attack : हॅकर्सची नजर सुप्रीम कोर्टावरही; पाकिस्तान नाही तर या देशाचा सायबर हल्ल्यात सर्वात मोठा हात)
जर 30 ते 40 लाखांचं घर असेल तर 3 ते 4 लाख रुपये कमी होतील. त्यामुळे नवी मुंबईतील सिडकोच्या (Cidco) घरांसाठी अर्ज केलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या 40 हजार घरांसाठी येत्या 2 ऑक्टोबरला लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 40 हजार घरांच्या लॉटरी काढण्यात येणार आहेत. याअंतर्गत वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ सिडकोची घरं असणार आहेत.
(हेही वाचा-Assembly Election : गर्दी टाळण्यासाठी मुंबईमध्ये असणार १० हजार १११ मतदान केंद्रे)
याशिवाय 13 हजार कोटींच्या भुखंडाच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला होता. या वादग्रस्त ऐरोलीतील 70 एकरच्या भुखंडाच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आहे. सिडकोची यापुढे सर्व कामे लोकांच्या समोर उघडपणे होतील, असं आश्वासन सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं. (Cidco)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community