CJI D.Y. Chandrachud म्हणाले, ‘रामजन्मभूमी निकालावर योग्य रस्ता दाखवण्यात देवाचा आधार घेतला’

117
CJI D.Y. Chandrachud म्हणाले, 'रामजन्मभूमी निकालावर योग्य रस्ता दाखवण्यात देवाचा आधार घेतला'
CJI D.Y. Chandrachud म्हणाले, 'रामजन्मभूमी निकालावर योग्य रस्ता दाखवण्यात देवाचा आधार घेतला'

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय . चंद्रचुड (CJI D.Y. Chandrachud) यांनी रामजन्मभूमी निकालासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणाले की, रामजन्मभूमी निकालावर योग्य रस्ता दाखवण्यात देवालाच रस्ता दाखवण्यास पूजाअर्चनेदरम्यान सांगितले. त्यामुळे आस्था असेल तर देव योग्य रस्ता दाखवतोच, असा विश्वास ही चंद्रचुड यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : Congress : मविआमध्ये फूट पडणार? सर्व घटक पक्षांमधील मुख्यमंत्रीपदाची लालसा आघाडीत करणार बिघाडी

सरन्यायाधीश चंद्रचुड (CJI D.Y. Chandrachud) पुढे म्हणाले, अनेक वेळा आपल्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार असतो, परंतु आपण योग्य निर्णयापर्यंत पोहचू शकत नाही. अयोध्या येथील रामजन्मभूमी प्रकरणावेळी ही असेच काहीसे घडले. हे प्रकरण तीन महिने खंडपीठासमोर होते. त्यानंतर मी देवासमोर बसलो आणि देवाला सांगितले की, तुम्हालाच आता याप्रकरणी समाधानकारक उतर शोधावे लागेल.

मी पूजा करतो. माझा विश्वास आहे

सरन्यायाधीशांनी म्हणाले, मी पूजा करतो. माझा विश्वास आहे की, जर आपली आस्था असेल तर देव नेहमी काही ना काही रस्ता दाखवतोच, असे ही चंद्रचुड (CJI D.Y. Chandrachud) म्हणाले. महाराष्ट्रातील कन्हेरसर गावातील आपल्या मूळगावी ते लोकांशी बोलत होते. सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या खंडपीठाने रामजन्मभूमी (Ram Janmabhoomi) विवादावर निकाल दिला होता. दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामजन्मभूमी प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने निकाल दिला. पाच न्यायाधीश असलेल्या खंडपीठात सध्याचे सरन्यायाधीश चंद्रचुड (CJI D.Y. Chandrachud) यांचाही समावेश होता.

हिंदू पक्षकारांचा विजय झाला

या खंडपीठाने वादग्रस्त बाबरी मशिदीची पूर्ण जमीन हिंदू पक्षाची असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी हिंदू पक्षकारांचा विजय झाला. त्यानंतर राममंदिराच्या निर्मितीची काम सुरु झाले. राममंदिरात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी रामल्लाची प्राणप्रतिष्ठा ही करण्यात आली.सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश चंद्रचुड दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची ५१ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान चंद्रचुड (CJI D.Y. Chandrachud) यांनी सरन्यायाधीश पदी न्यायाधीश संजीव खन्ना (Sanjiv Khanna) यांच्या नावाची शिफारस केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.