सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपतो आहे. सरन्यायाधीशच पुढे हे पद कुणाला दिलं जावं? याबाबतची शिफारस करत असतात. त्यानुसार चंद्रचूड यांनी संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांनी कायदा मंत्रालयालयाला पत्र लिहून पुढचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची नियुक्ती करा असं पत्र लिहिलं आहे.( CJI Chandrachud )
केंद्र सरकारने चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांची शिफारस मंजूर केली तर देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड केली जाईल. १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. संजीव खन्ना हे आत्ताच्या काळातले सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे आपल्या पदाचा वारसा ते पुढे चालवतील अशी बाब चंद्रचूड यांनी त्यांच्या पत्रात नमूद केली आहे.
कोण आहेत संजीव खन्ना?
संजीव खन्ना हे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. १९८३ मध्ये ते बार कौन्सिलचे सदस्य झाले होते. त्यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे. त्यानंतर ते दिल्ली येथील उच्च न्यायालयात आणि लवादांमध्ये काम करु लागले. संजीव खन्ना यांनी प्रदीर्घ काळ सिनियर कौन्सिल म्हणून प्राप्तीकर विभागातही काम केलं. तसंच त्यांनी सरकारी वकील म्हणून दिल्लीतली अनेक गुन्हेगारी प्रकरणं लढवली आहेत. ( CJI Chandrachud )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community