संभल (Sambhal) येथील हिंसाचारानंतर शाही जामा मशिद चर्चेत आहे. त्यातच आता संभल येथील जामा मशिदीचा एक व्हिडिओ उघडकीस आला आहे. या व्हिडिओत जामा मशिदीतील एक इमाम लाऊडस्पीकर नसतानाही अजान देताना दिसत आहे. ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, संभलमधील (Sambhal) जामा मशिदीचा (Jama Masjid) इमाम लाऊडस्पीकर नसतानाही त्या ठिकाणी अजान देत होता. यामुळे स्पष्ट होते की, संभलमधील जामा मशिदीत लाऊडस्पीकर नसतानाही अजान देत आहेत. (Sambhal)
( हेही वाचा : होळी खेळण्यास Pakistan मधील विद्यापीठात बंदी; नियमभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल)
लाऊडस्पीकर नसतानाही का देत आहेत अजान?
मिळालेल्या माहितीनुसार, संभल हिंसाचारानंतर (Sambhal violence) पोलिस प्रशासनाने कठोर नियम केले आहे. यादरम्यान धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर वापरण्याससंदर्भात कठोर नियमावली पोलिस प्रशासनाने जारी केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात संभलमधील मशिदीवर कारवाई केली आहे. त्यानंतर इमामचा हा अजानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Sambhal)
दरम्यान हिंदू (Hindu) पक्षकारांनी दावा केला की, संभल येथील जामा मशिदी हिंदू मंदिर (Hindu temple) तोडून बनवण्यात आली आहे. हिंदू पक्षकार मुघलकालीन दस्ताऐवजांचा आधार घेत, ब्रिटिशकाळातील एएसआय रिपोर्टनुसार हा दावा करत आहेत. दुसरीकडे मुस्लिम पक्षकारांनी संभलमधील जामा मशिद मुघलकाळात कोणतेही मंदिर तोडून बनवली नाही, असे सांगितले. पण सध्या हे प्रकरणात न्यायालयात प्रलंबित आहे. (Sambhal)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community