मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट पार पडली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून भाजप-मनसे युतीच्या शक्यतेबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Mahakumbh 2025 : विदेशींनी जाणले महाकुंभ पर्वातील अमृत स्नानाचे महत्त्व)
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरे यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (CM Devendra Fadnavis)
भाजप काही महत्त्वाच्या जागा मनसेला सोडू शकते, त्यामुळे मनसेच्या राजकीय ताकदीत वाढ होऊ शकते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप आणि मनसे एकत्र येतील का, याबाबत अनेक तर्क लावले जात होते. मात्र, या भेटीनंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे. (CM Devendra Fadnavis)
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजप-मनसे युतीचा डाव आखला जात आहे. भाजपला मराठी मतदारांमध्ये आपली पकड वाढवायची असून, मनसेची साथ मिळाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Ind vs Eng, 2nd ODI : ३२ व्या एक दिवसीय शतकानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?)
या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी राजकीय गणिते आखली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community