अवैध हुक्का पार्लरचा परवाना रद्द करणार ; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

अवैध हुक्का पार्लरचा परवाना रद्द करणार ; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

62
Maharashtra Assembly Session 2025 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर: सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाटपाचा तिढा सुटला
Maharashtra Assembly Session 2025 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर: सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाटपाचा तिढा सुटला

राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी आहे. तरीही हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अवैधरित्या हुक्का पार्लरवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करून अवैध हुक्का पार्लर चालविण्याचा तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास अजामीनपात्र गुन्हा समजण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) विधानसभेत दिली.

हेही वाचा-Yogesh Kadam यांचे कुणाल कामरा प्रकरणावर मोठे वक्तव्य; कायद्यानुसार कारवाई होणार

अवैध हुक्का पार्लरबाबत सुनील कांबळे, संजय केळकर, सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, सिद्धार्थ शिरोळे, आशीष देशमुख आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. अवैधरित्या हुक्का पार्लर चालविण्याचा गुन्हा केल्यास तीन वर्ष कैदेची शिक्षा होते, आता दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास कैदेसह उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करून हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येईल. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- कुणाल कामराच्या वादग्रस्त टिप्पणीवर Yogi Adityanath यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘काही लोकांनी देशाचा…’

हुक्का पुरवठा करण्याबाबत हुक्का पार्लरशी संबंधित गुन्हा समजण्यात येईल. पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध हुक्का पार्लरच्या व्यवसायाबाबत कारवाई न केल्यास पोलिसांवरही कारवाई करण्यात येईल. यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली २.० कार्यान्वित; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते उद्घाटन

ई सिगारेटचे व्यसन तरुणाईला आपल्या विळख्यात घेत आहे. ई सिगारेट ‘स्टाईल स्टेटमेंट’ समजले जाते. ई-सिगारेटवर बंदी आहे, याबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्यात विशेष मोहीम राबवून अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात येईल. हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैध हुक्का पार्लर चालवत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी ५० गुन्हे दाखल करण्यात आले असून सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.