
13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी (Kopardi case) गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (CM Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली अन् नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले.
“गेल्या काही वर्षांपासून मी कुटुंबाशी जोडलो गेलो आहे. त्या घटनेपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आपुलकी आहे. मला आमंत्रण मिळताच मी लग्नाला येईन आणि जोडप्याला आशीर्वाद देईन असे वचन दिले होते.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (CM Devendra Fadnavis)
https://x.com/mipravindarekar/status/1865753499323052186
“कोपर्डीत ८ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता. आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा! या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते,” असं प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community