
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तरी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तरात म्हटलं आहे.
हेही वाचा-‘PoK’ वरील बेकायदेशीर कब्जा पाकिस्तानने सोडावा ; भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये खडसावले
विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “सुनील प्रभूंनी जी आकडेवारी मांडली, तीच आकडेवारी नाना पटोलेंनी मांडली. मूळातच मला असं वाटतं की, विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल. आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव संधी असते, ज्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही, त्यातील महत्त्वाचे विषय अंतिम आठवडा प्रस्तावात आणता येऊ शकतात. पण दुर्देवाने तसं होऊ शकलं नाही. मी व्हॉलिंटियर करायला तयार आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर भुजबळ आणि मुनगंटीवार यांचीही मदत घेईन. शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं लोकशाहीत महत्त्वाचं आहे. सक्षमता ही संख्येने ठरत नाही. भुजबळ साहेब एकटेच होते. संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे. पण विषय योग्यच घ्यायचे. म्हणून मला वाटतं भास्करराव, तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झाल्याचा दिसतो.” असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. (CM Devendra Fadanvis)
हेही वाचा- Chhattisgarh Naxal Encounter : दंतेवाडा-बिजापूर सीमेवर 5 नक्षलवादी ठार ; मृतदेहांसह शस्त्रे जप्त
पुढे बोलताना ते म्हणाले, “गृहमंत्री असलो की प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. 2022 ते 24 तुम्ही मला टार्गेट केलं. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मँडेट आम्हाला दिलं. कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही. माझा सगा भारताचं संविधान आणि माझे सोयरे हे 13 कोटी महाराष्ट्राची जनता आहे. याच्यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही.” (CM Devendra Fadanvis)
“अलिकडे एक वाक्य वापरलं जातंय… कुंपनच शेत खातंय… कुंपनच शेत खातंय… आहे कुठलं कुंपन नाना भाऊ? आमच्या शेताला कुंपनच नाही. हे खुलं शेत आहे. कोणीही येऊ शकतं आमच्या शेतात. मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्यासाठी. त्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. त्या कोरटकरला पकडलं. कुठं पकडलं? कुठे लपून बसला होता? तेलंगनात कुणाच्या घरी? कोण त्याला आश्रय देत होता? आपल्याला राजकारण करायचं नाही. शिवाजी महाराजांवर कोणी बोलत असेल तर कारवाई करूच. कारण ते आपलं दैवत आहे. दैवताचा अपमान निश्चितपणे सहन करणार नाही,” असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. (CM Devendra Fadanvis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community