आता शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही ; CM Devendra Fadnavis यांची अमित शाहांसमोर मोठी मागणी

74
आता शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही ; CM Devendra Fadnavis यांची अमित शाहांसमोर मोठी मागणी
आता शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही ; CM Devendra Fadnavis यांची अमित शाहांसमोर मोठी मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाहांसमोर एक मोठी मागणी केली. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि मराठा साम्राजाच्या इतिहासाचा ज्यांनी अभ्यास केला, जगभरातील पुरावे मिळवून हा इतिहास समजून घेतला, इतिहासाचं वाचन आणि लेखन केलं. ते गृहमंत्री अमित शाह आले आहेत. ते गृहमंत्री म्हणून आले नाहीत शिवाजी महाराजांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-शिवरायांना अभिवादन करण्यासाठी Amit Shah किल्ले रायगडावर; म्हणाले, ‘स्वत:ला आलमगीर म्हणवणाऱ्याची कबर महाराष्ट्रात…’

उदयनराजे त्यांच्या भाषणात म्हणाले की “छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचं सरकारने प्रकाशन करावं.” उदयनराजेंच्या या मागण्यां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलं. (CM Devendra Fadnavis)

फडणवीस म्हणाले, “उदयनराजेंनी काही मागण्या केल्या. आम्ही त्यावर चर्चा केली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं. पण आपण लोकशाहीत आहोत. आपण अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीने तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आम्हालाही ती मागणी योग्य वाटते. राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. आम्ही निश्चितपणे हे कामही लवकरच हाती घेऊ.” (CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित राष्ट्रीय स्मारक बांधण्याची मागणी केली. अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य सरकार न्यायालयीन लढाई लढेल याचीही त्यांनी खात्री दिली. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-“भारतीय त्याच लायकीचे आहेत…” Tahawwur Rana चं वक्तव्य ; अमेरिकेच्या न्याय खात्याने दिली महत्त्वाची माहिती

पुढे फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत का आहेत. कारण देशात मोगलाई होती, आदिलशाही होती. देशातील राजे राजवाडे कुठे तरी भंग पावत होते. मोडकळीस येत होते. परकीय आक्रमकाचं राज्य कधीच संपणार नाही, अंधकार झाला होता, असं वाटत असतानाच आई जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी सूर्य निर्माण झाला. शिवाजी महाराज नसते तर आपण कोणीच नसतो, असे म्हणत त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.