-
प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते विधेयकाला विरोध करणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बुधवारी शिवसेना उबाठाला नाव न घेता लगावला. संसदेत सादर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला ते समर्थन देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बुधवारी लोकसभेत वादग्रस्त वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाचे स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. कोणाच्याही आस्थेला ठेच पोहचविणारे नाही. तर, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता या सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत आहे.
(हेही वाचा – सामना आमच्याशी आहे, लक्षात ठेवा; पाकिस्तानी सिनेमावरून MNS चा इशारा)
वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणाच्याही आस्थेला ठेस पोहचविणारे नाही. अतिशय प्रागतिक आणि पुरोगामी पाऊल या निमित्ताने टाकण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवेल असे सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वक्फ सुधारणा विधेयक संमत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुळ वक्फ कायद्यात वक्फ मंडळाला अमर्याद अधिकार बहाल करण्यात आले होते. एखादा चुकीचा निर्णय झाल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याचीही मुभा नव्हती. आजच्या सुधारणा विधेयकाने या जुन्या चुका सुधारण्याची तरतूद निर्माण होणार आहे. वक्फ सुधारणा विधेयकातून अनेक चुकीच्या बाबींना पायबंद बसणार आहे. यापूर्वीच्या कायद्यामुळे गावेच्या गावे किंवा अनेकांच्या जमिनी वक्फमध्ये दाखवून त्या लाटल्या जात होत्या. जमिनी काढण्याचे हे प्रकार सुधारणा विधेयकामुळे थांबणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा – Waqf Amendment Bill : हा कायदा स्वीकारावाच लागेल; अमित शाह यांचे निर्देश)
१०० दिवसांचा कृती आरखड्याची प्रभावी अंमलबजावणी
दरम्यान, राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात १०० दिवसांच्या विभाग निहाय कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी २६ विभागांचे मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित होते. १०० दिवसांच्या आरखड्यात ९३८ कृतीबिंदूवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ४११ कामे पूर्ण झाली असून ३७२ कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर केवळ १५५ कामे अर्थात १६ टक्के मुद्दयांवर काम बाकी आहेत. त्यासाठी विभागांना १५ दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला असून १ मे पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. बुधवारी २६ विभागांचा आढावा घेतला असून गुरुवारी २२ विभागांचा आढाचा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community