शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर उपलब्ध करून द्या; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश

46
शासनाच्या सर्व विभागांची माहिती 'सीएम डॅश बोर्ड'वर उपलब्ध करून द्या; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश
शासनाच्या सर्व विभागांची माहिती 'सीएम डॅश बोर्ड'वर उपलब्ध करून द्या; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश

शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ (CM Dash Board) लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (S३WaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये 34 विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

( हेही वाचा : Infiltrators : घुसखोरांपासून देश सुरक्षित करण्यासाठी येणार नवा कायदा? काय आहेत वैशिष्ट्ये?

विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (Vikas Kharage) , माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड (CM Dash Board) जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची ‘स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा.ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया (Parag Jain-Nainutiya) यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा ‘सीएम डॅश बोर्ड व ‘स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली सातत्याने अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.