CM Devendra Fadnavis यांनी एका वाक्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे केले वर्णन; म्हणाले…

जयंत पाटील यांनी पक्षफोडीबद्दलही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला.

98
राजभवनात आयोजित ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे एका वाक्यात वर्णन केले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांचे दोन-दोन वाक्यांमध्ये वर्णन करा, असे जयंत पाटील यांनी मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, मी या दोन्ही नेत्यांचे एकाच वाक्यात वर्णन करू इच्छितो आणि ते म्हणजे…काही भरवसा नाही. दरम्यान, दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे वर्णन करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. मात्र काही भरवसा नाही, या वाक्यातच दोन्ही नेत्यांचे वागणे येते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
जयंत पाटील यांनी पक्षफोडीबद्दलही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिवाद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट करत असतो, तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. समोरच्यांना फोडलेले पक्ष दिसतात, पण चोरलेला जनादेश दिसत नाही. जर २०१९ ला लोकांनी दिलेला निकाल चोरला गेला नसता तर नंतर पक्षफोडीचा विषयच आला नसता आणि आम्ही हे पक्ष फोडलेच नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांवर त्याच्या पक्षनेतृत्वाने ती वेळ आणली, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.

मी महाराष्ट्रातच राहणार

मुलाखतीत जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला की, नरेंद्र मोदींचे ७५ वर्ष पूर्ण होतील, ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत अशी तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल यात काही शंका नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस…या सगळ्यात देवेंद्र फडणवीस आपल्याला कुठे पाहतात..? त्यावर देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) थेटपणे उत्तर देत मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. २०२९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवेत. ही आमची इच्छा आहे. ती लादण्याचा प्रयत्न करू असं सांगितले. मोदी फिजिकल फीट, २०२९ ला तेच पंतप्रधान हवेत७५ वर्षाची सीमा मोदींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदी फिजिकल फिट आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे २०२९ साली मोदींनीच पंतप्रधान व्हावे ही पक्षातील सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही ही इच्छा लादण्याचा प्रयत्न करू. देवेंद्र फडणवीस पक्षाचा असा कार्यकर्ता आहे ज्याला जिथे टाकाल तिथे तो फिट आहे. आज तरी मला पक्षाने महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन असं देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत सांगितले. दरम्यान, या नेत्यांच्या मांदियाळीत मला चौथ्या नंबरवर आणलं त्यासाठी आभार परंतु मला माझ्या क्षमता आणि मर्यादाही माहिती आहेत. मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. मी मुंबईत अतिशय खुश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईतला वातावरण उत्तम आहे. मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीत नाही. त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले..
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.