CM Devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ०४ एप्रिलला सह्याद्री अतिथिगृह (Sahyadri Guest House) कोळसा खाणीसंदर्भात (Coal mine) बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोळसा उत्पादनापासून (Coal production) त्याच्या वापरापर्यंत प्रत्येक टप्प्याचे सखोल विश्लेषण करून सर्वोत्तम दर्जाचा कोळसा कमी खर्चात आणि योग्य वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून महाजनकोने (Mahajanko) गारे पेल्मा दोन (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. (CM Devendra fadnavis)
(हेही वाचा – Veer Savarkar यांचा अवमान केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका; समन्स रद्द करण्यास नकार)
महाजनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. (Mahajanco President Radhakrishnan B) यांनी यावेळी कोळसा खरेदी आणि महाजनकोच्या वीज निर्मिती प्रक्रियेबाबत (Mahajanko’s electricity generation process) माहिती सादर केली. मुख्यमंत्री यांनी छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील गारे पेल्मा दोन कोळसा खाणीसाठी आवश्यक परवानग्या मिळवून महाजनकोने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश दिले. वीज निर्मितीचा खर्च कमी करून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाजनकोने (MAHAGENCO) आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बैठकीत ऊर्जा, महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –