CM Devendra Fadnavis यांचा ‘तो’ ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा चर्चेत

158

CM Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत विविध प्रोजेक्टचा उल्लेख करत पुढील पाच वर्षांचा कालखंड हा राज्याच्या पायाभूत विकासावर भर देणारा असेल असा संदेश दिला. २०१४ ते २०१९ पर्यंत पाच वर्षांच्या कालखंडात त्यांनी अशाच मोठ मोठ्या प्रकल्पांवर काम केले आणि ते पूर्णत्वास आणले, त्या कालावधीत आणखी एका प्रकल्पाची चर्चा सुरु झाली होती, मात्र त्यानंतरच्या कालखंडात त्यांच्या हातून सत्ता निसटल्याने त्या प्रकल्पाची चर्चा थांबली होती. आता फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाची चर्चा परत सुरु झाली आहे.

कोणता आहे तो प्रकल्प? 

मुंबई-पुणे हा प्रवास सद्ध्या तीन ते चार तासांचा आहे. मात्र हा प्रवास आता हायपरलूपच्या वायू वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून चक्क 25 मिनिटांवर होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी आपल्या ट्विटरवर हायपरलूपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पहिल्या पर्वात हायपरलूपच्या तंत्रज्ञानाला गती देत मुंबई पुण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता तो आता प्रत्यक्षात येण्याचे स्पष्ट संकेत केंद्राने दिले आहेत. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील या प्रकल्पाला गती मिळणार आहे. देशातील पहिला मुंबई-पुणे हा मार्ग हायपरलूप या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कनेक्ट केला जाणार आहे. वायूवेगाने धावणाऱ्या या हायपरलूप ट्रेनची गती ही 1200 च्या स्पीडने धावणार आहे. मात्र मुंबई-पुणे दरम्यान 600 किलोमीटर या वेगाने ती धावणार आहे.

(हेही वाचा अपमान सहन न झाल्याने Aaditya Thackeray सभागृहातून बाहेर गेले?)

अवघ्या २५ मिनिटांत मुंबई-पुणे प्रवास 

यासाठी अत्याधुनिक ट्रेनला कुठेही थांबा नसेल मुंबई ते पुणे असा थेट प्रवास करावा लागेल. या ट्रेनचे तिकीट दर हा विमान प्रवासाइतका असण्याची शक्यता आहे. हायपरलूप या भारतासाठी नव्या असलेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानात एका पॉडमध्ये सुमारे, कमीत कमी 24 तर जास्तीत जास्त 28 प्रवासी बसू शकतात. अमेरिकेमधील लॉस एंजेलिस-सॅन फ्रांसिस्को या दोन शहरादरम्यान न थांबता झटपट प्रवासासाठी ही कल्पना मांडली होती. २०१३ मध्ये एलन मस्क यांनी ही संकल्पना मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या पहिल्या पर्वात मुंबई पुणे यासाठी हायपरलूप सेवेला प्राधान्य देत या मार्गावर हायपरलूप हा अमेरिकन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक ड्रीम प्रोजेक्ट मुंबई-पुणे मार्गाकरीता सुरू करण्याची घोषणा केली होती. (CM Devendra Fadnavis)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.