Manikrao Kokate : वारंवार बेताल वक्तव्ये करणाऱ्या राज्याच्या कृषि मंत्री (Agriculture Minister) माणिक कोकाटे (Manik Kokate) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अखेर चाप लावला. त्यांच्या कृषि खात्यातील बदल्यांचे अधिकारही फडणवीस यांनी काढून घेऊन स्वतःकडे घेतल्याचे समजते. (Manikrao Kokate)
वादग्रस्त वक्तव्ये
“हल्ली भिखारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
त्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या वडाला कोकाटे यांनी तोंड फोडले. ‘कर्ज घ्यायचे आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? सरकार भांडवली गुंतवणूक करते. शेतकरी करतो का? शेतकरी, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करतात,” असे वक्तव्य करून कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला.
(हेही वाचा – Mumbai Fire Brigade : अभिनेते सोनू सुदने मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचे ‘या’ शब्दांत केले कौतुक)
तरी कारवाई नाही
या व्यक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना अप्रत्यक्ष दम भरला. तरी त्यानंतर १० एप्रिल २०२५ या दिवशी कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुनावले. “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावातून दोन-पाच हजार रुपये फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही काही मर्यादा आहेत. दुप्पट तिप्पट ठीक आहे, पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच,” असा विचत्र तर्क कृषि मंत्री कोकाटे यांनी काढला आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र कोकाटे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
(हेही वाचा – Amaravati Airport : अमरावती-मुंबई विमानभाडे डबल; अनेकांचा हिरमोड)
मंत्रीपद वाचले
फेब्रुवारी २०२५ मध्ये माणिक कोकाटे आणि त्यांच्या बंधूना नाशिक सत्र न्यायालयाने घर खरेदीच्या एका प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्री पद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली असतानाच नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांचे मंत्रीपद थोडक्यात वाचले.
(हेही वाचा – चापेकर बंधूंचे शौर्य अतुलनीय; क्रांतिवीर चापेकर स्मारकाचे CM Devendra Fadanvis यांच्या हस्ते लोकार्पण)
मुख्यमंत्र्यांकडून दखल
या सगळ्याचा परिपाक म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता त्यांच्या कृषि खात्यातील (Agriculture Department) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारच काढून स्वतःकडे घेतले. कृषि संचालक, कृषि अधीक्षक यांच्या बदल्या आणि नेमणुकांमध्ये कोकाटे यांना हस्तक्षेप करता येणार नाही तर त्या थेट फडणवीस करतील, असे सूत्रांकडून सांगायत आले. काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी एका कार्यक्रमात आमच्या हातात काही नाही, मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएससुद्धा मुख्यमंत्री ठरवतात,’ असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत ते अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात, असेही सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community