हिंदी भाषेच्या सक्तीवर CM Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

176

Devendra Fadnavis : राज्यात येत्या जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) लागू होत आहे. परिणामी या वर्षी इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य (Hindi Language) करण्यात आली आहे. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता १ ते ५ मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. यावरून आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. परंतु, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Cyber ​​Security : वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी नागरिकांच्या सेवेत येणार २४ तास ‘डिजिटल रक्षक’)

‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार (State School Curriculum Plan 2024), मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. येत्या जून महिन्यापासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू होत असून या वर्षापासूनच नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यावरून मनसे नेते राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. तसेच महाविकास आघाडीतील पक्षांनीही हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आहे.

(हेही वाचा – हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही; Raj Thackeray यांची भूमिका)

मनसेचा विरोध
दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. हिंदी ही भारताची राजभाषा नाही. संविधानातही तसे नमूद नाही. ती दोन-तीन राज्यांची भाषा असू शकते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. त्यानुसार प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे. आता दुसऱ्या राज्याची भाषा तुम्ही आमच्यावर थोपू शकत नाही. त्याला आमचा ठाम विरोध आहे. महाराष्ट्रात केवळ मराठी भाषा अनिवार्य असावी. तिसरी भाषा ऐच्छिक असावी. त्यावर आमची हरकत नाही. पण तिला अनिवार्य करण्याला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती झाल्यास मनसे निश्चितच आंदोलनाची भूमिका घेईल, असे मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.