सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार आहे, त्यामुळे अतिशय कमकुवत विरोधकांना प्रचंड बहुमत असलेले महायुती सरकार न्याय देणार का, अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसाठी कामकाजात सहभागी होण्याच्या दृष्टीने गाईडलाईनच दिली आहे. विरोधकांनी चर्चेत सहभागी व्हावे, लोकसभेप्रमाणे चर्चा न काढता पळ काढायचा असे कृत्य विरोधकांनी करू नये आणि माध्यमांसमोर जाऊन बोलणे हे काही लोकशाही नाही. उलट चर्चा करून ते माध्यमांसमोर आले तर त्याला लोकशाही म्हणता येईल, असे मुख्यमंत्री फडवणीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
EVM म्हणजे…
नागपूर येथे महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाची शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे पत्रकार परिषदेत बोलत होते. हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे, त्यामुळे या अधिवेशनात आम्ही जनतेला ऊब आणि ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने काम आम्ही निश्चित करू. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आणि आज आमच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली ज्यात 6 राज्य मंत्री आहेत. आजपासून आमची गतीशील कारभार आम्ही सुरू केला आहे. येत्या 2 दिवसांत आम्ही खातेवाटप करू. चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांनी आम्हाला एक पत्र दिले, मागच्याच वर्षीचे पत्र फक्त त्यात ईव्हीएमचा मुद्दा त्यात दिला आहे. म्हणून त्यांनी हिवाळी अधिवेशनाला चुकून पावसाळी अधिवेशन म्हणाले होते. कारण जुनेच पत्र त्यांनी दिले आहे. आम्ही निश्चितपणे त्यांच्या पत्राचे उत्तर आम्ही देऊ. ईव्हीएमबद्दल देखील आम्ही त्यांना उत्तर देऊ. या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान )
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे एकच ध्येय आहे समृद्ध महाराष्ट्र. महाविकास आघाडीने जे कामे बंद केली होती त्याला आम्ही पुन्हा सुरू करत पूर्ण केले. लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली. तुमचे अंदाज देखील फोल ठरले आणि बहुमत आम्हाला मिळाले. जसे मी मुख्यमंत्री असताना मला देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पाठिंबा दिला तसेच मी सुद्धा देणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे बहुमत आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने रेटू असे नाही. विरोधकांनी देखील प्रश्न विचारायचे असतात. विरोधक संख्येने जरी कमी असले तरी त्यांना दुर्लक्ष करणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.
Join Our WhatsApp Community