CM Devendra Fadnavis यांच्याकडून पानिपत शौर्य दिनानिमित्त अभिवादन

पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांनी आपले शौर्य इतके वाढवले की, या भारतावर आक्रमणे करण्याची हिंमत कुणाची झाली नाही, असे CM Devendra Fadnavis म्हणाले.

66

मराठ्यांची वीरता दिल्लीपर्यंत पोहचली होती, पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची इतिहासात नोंद झाली आहे. या लढाईत मराठ्यांचा तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला, पण वस्तुतः मराठे कधीचे हरले नव्हते. या शौर्याच्या निमित्ताने मंगळवार, १४ जानेवारीला CM Devendra Fadnavis यांनी अभिवादन केले.

सुमारे २६४ वर्षांपूर्वी हे पानिपतचे युद्ध झाले होते. या युद्धात मराठ्यांचा बादशाह अहमदशहा अब्दालीकडून पराभव झाला होता. CM Devendra Fadnavis यांनी पानिपत येथे मराठा योद्धांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. आज भगव्या झेंड्याखाली आणि भारताच्या तिरंग्याखाली सगळ्यांना एकत्रित येणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Shiv Sena (UBT) : शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेना जवळपास काँग्रेस झाली आहे, असं कोण म्हणालं ?)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पानिपतचे तिसरे युद्ध इतिहासातील सर्वांत मोठी घटना आहे, मराठ्यांची वीरता आणि शौर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला छत्रपतींच्याच आशीवार्दाने संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचे काम मराठ्यांनी केले. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांनी आपले शौर्य इतके वाढवले की, या भारतावर आक्रमणे करण्याची हिंमत कुणाची झाली नाही, असे CM Devendra Fadnavis म्हणाले. पानिपतच्या शौर्यभूमीला वंदन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आमचा इतिहास जीवंत ठेवण्याचे काम केल्याबद्दल शौर्य भूमीच्या ट्रस्ट मनापासून आभार मानतो. मातृभूमीसाठी धारातीर्थी पडलेल्यांना या ट्रस्ट आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम चालतो. या कार्यक्रमातून आमच्या शौर्याचे एकप्रकारे संवर्धन करण्याचे काम हे ट्रस्ट करत आहे. याबद्दल मी ट्रस्टचे अभिनंदन करतो, असेही CM Devendra Fadnavis म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.