मंत्र्यांच्या मनमानीला CM Devendra Fadnavis यांच्याकडून चाप!

54
मंत्र्यांच्या मनमानीला CM Devendra Fadnavis यांच्याकडून चाप!
  • खास प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका कृतीतून कोणत्याही मंत्र्यांची मनमानी चालणार नाही, असा संदेश महायुतीतील सगळ्याच राजकीय पक्ष, मंत्री आणि आमदारांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गेले दोन दिवस अजित पवार यांच्या नाराजीची चर्चाही जोर धरू लागली आहे. याचे कारण म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी परस्पर स्थगिती दिली. यामुळे अजित पवार नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

राज्यात महायुती म्हणून तीन राजकीय पक्ष काम करीत आहेत. त्यामुळे तीनही पक्षांमध्ये चर्चा व्हायला हवी, समन्वय साधला जावा अशी आपली इच्छा असल्याचे पवार म्हणाले. महायुती म्हणून जर भविष्यात वाटचाल करायची असेल तर किमान पक्ष प्रमुखांशी तरी आधी चर्चा करणे इष्ट ठरेल. तसेच मंत्र्यांच्या निर्णयांना स्थगिती देण्याआधी संबंधित मंत्र्यांशी एकदा तरी चर्चा करून स्थगितीबाबत भूमिका घ्यावी, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी महायुतीच्या बैठकीत केला Raj Thackeray यांचा उल्लेख; तर आमदारांना दिला ‘हा’ सल्ला)

वादाला तोंड

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि या वादाला तोंड फुटले. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे फडणवीस यांनी मंत्र्यांच्या मानमानी कारभाराला चाप लावल्याची चर्चा आहे.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी वेगळी भूमिका घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावेळी भिन्न विचारधारा आणि संस्कृती, तसेच प्रशासकीय कामाचा शून्य अनुभव असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने अनेक मंत्र्यांची मनमानी सुरू होती, असे बोलले जाते. तसा प्रकार या सरकारमध्ये खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश फडणवीस यांनी ‘स्थगिती’द्वारे दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.