नांदेड अपघातग्रस्ताला CM Devendra Fadnavis यांची मदत ; घेतली शिक्षणाची जबाबदारी

नांदेड अपघातग्रस्ताला CM Devendra Fadnavis यांची मदत ; घेतली शिक्षणाची जबाबदारी

45
नांदेड अपघातग्रस्ताला CM Devendra Fadnavis यांची मदत ; घेतली शिक्षणाची जबाबदारी
नांदेड अपघातग्रस्ताला CM Devendra Fadnavis यांची मदत ; घेतली शिक्षणाची जबाबदारी

वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रैक्टर विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृताचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-Charitable Hospitals मध्ये नियमांचे पालन होते कि नाही; सरकार करणार सखोल तपासणी

शुक्रवारच्या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. घटनेतील कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे राहिले असून नांदेड व हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- Ram Navami 2025 : रामनवमीनिमित्त राज्यातील राममंदिरे भाविकांनी फुलली; नाशिक, शेगावसह सर्वत्र उत्साहाचे वातावरण

नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- Ram Navami : अयोध्येत रामजन्मोत्सव सुरू ; ४ मिनिटांसाठी श्रीरामाचा सूर्य टिळक, रामजन्मभुमी २ लाख दिव्यांनी उजळणार !

त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- Raigad Fort : किल्ले रायगडावर बसवलेले सीसीटीव्ही गेल्या ५ वर्षांपासून बंद !

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- ChatGPT : चॅट जीपीटी नेमकं वापरायचं कसं? चॅटजीपीटीचं गाईड

तहसीलदार दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.