-
खास प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
३० जानेवारी २०२५ या दिवशी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका जाहीर सभेत भाजपावर थेट आरोप केले. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर कुठेही जल्लोष, मिरवणुका असे वातावरण नव्हते, तर ‘सन्नाटा’ पसरला होता. जिंकून आलेल्या उमेदवारांनाही विश्वास बसत नव्हता, असे सांगून ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणाले की, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना कल्याण मतदार संघातील त्यांच्या १,४०० मतदार असलेल्या गावात पाटील यांना यापूर्वीच्या निवडणुकीत बहुतांश मतदान झाले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही मत मिळाले नाही.
(हेही वाचा – Mumbai Airport वर ८ कोटींचा गांजा जप्त, दोघांना अटक)
गावातून एकही मत नाही
मराठवाड्यातील मनसेचे एक माजी नगरसेवक असलेल्या उमेदवाराला त्याच्या नगरसेवक वॉर्डमध्ये ५,५०० मतदान झाले होते आणि नुकत्याच विधानसभेला संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून केवळ २,५०० मतदान झाले, याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आश्चर्य व्यक्त केले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले आणि आता १० हजार मतांनी त्यांचा पराभव झाल्याचे धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाचे ४-५ आमदार निवडून येतील की नाही, अशी परिस्थिति असताना ४२ आमदार निवडून आले कसे? यावरही ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
(हेही वाचा – BMC : पुलांची उभारणी करताना महानगरपालिका राखणार ‘या’ प्राधिकरणांशी सुसंवाद)
राजकारणावर चर्चा
सोमवारी १० फेब्रुवारी २०२५ या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि जवळपास एक-सव्वा तास चर्चा केली. भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ‘राजकीय चर्चा झाली नाही’, असे स्पष्ट केले. मात्र महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकारणी तासभर भेटून राजकारणावर चर्चा होणार नाही, यावर कोणाचा विश्वास बसेल का?
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्या जवळचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण)
गैरसमज दूर
मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर सभेत जे आरोप केले त्यातील काही आरोपांबाबत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना एका गावात १,४०० मतदारांपैकी एकही मत मिळाले नाही, ही माहिती चुकीची असल्याचे फडणवीस यांनी लक्षात आणून दिले आणि त्यांचा गैरसमज दूर केला. राजू पाटील यांच्या काटई गावात पाटील यांना १,४७० मतदारांपैकी ६८३ मते मिळाल्याचे स्पष्ट केले. तसेच महायुतीने लोकसभा आणि विधानसभेच्या ५-६ महिन्यांत अनेक जनहितार्थ निर्णय घेतले, योजना राबवल्या याचेही थोडक्यात विश्लेषण केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community