महाराष्ट्राचे २१वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी गुरुवार, ५ डिसेंबर या दिवशी शपथ (CM Devendra Fadnavis oath ceremony) घेतली. आझाद मैदान येथे झालेल्या भव्य सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा व्यासपीठावर जयघोष करण्यात आला.
View this post on Instagram
या कार्यक्रमाचे निवेदन करताना निवेदिकेने राष्ट्रपुरुषांच्या नावाचा जयघोष केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला. वीर सावरकर यांच्या नावाचा जयघोष केल्याबद्दल सावरकरप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेसने कायम वीर सावरकर यांचा द्वेष केला आहे, मात्र महाराष्ट्रात भाजपाप्रणित महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात (CM Devendra Fadnavis oath ceremony) वीर सावरकर यांचा हा सन्मान करून हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
(हेही वाचा CM Devendra Fadnavis यांच्या शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा)
राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने या सोहळ्याची (CM Devendra Fadnavis oath ceremony) सुरुवात झाली. जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस उभे राहिले तेव्हा एकच जल्लोष झाला. त्यानंतर दुसरी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन, रामदास आठवले, चिराग पासवान, मुरलीधर मोहोळ, पियुष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, एडी कुमारस्वामी, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रवी राणा, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपाप्रणित राज्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्वा सरमा, नितीश कुमार, प्रमोद सावंत, चंद्राबाबू नायडू, मोहन यादव आणि गौतम अदानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी हे उद्योजक उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community