CM Devendra Fadnavis यांचे लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला समर्थन; म्हणाले, खोटी ओळख दाखवून…

61
अल्पसंख्याक शाळा मान्यतेबाबतच्या निर्णयाला CM Devendra Fadnavis यांची स्थगिती

एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे यात काही चुकीचे नाही. मात्र खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून एखाद्याशी लग्न करणे आणि नंतर त्याला सोडून देणे हे चुकीचे आहे. अशा घटना वारंवार घडत असून या खूप गंभीर आहेत. यावर कारवाई करायलाच हवी, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी लव्ह जिहाद कायद्याचे समर्थन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra gov) वतीने लव्ह जिहाद (Love jihad) विरोधात फायदा करण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली असून यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

( हेही वाचा : New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि…’ ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद विरोधात समिती स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis ) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात लव्ह जिहादचे (Love jihad) वास्तव दाखवून दिले आहे. महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) राज्यातही अशा घटना वाढत असल्याचे आपण सातत्याने पाहत आहोत. त्यात घडणाऱ्या घटनाही खूप गंभीर आहेत, यावर कारवाई केली पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येणार आहे. लव्ह जिहादच्या (Love jihad) वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फसवणूक व बळाचा वापर करून केलेले धर्मातरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलिस महासंचालक (DGP’s Of Maharashtra) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. (CM Devendra Fadnavis )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.