CM Devendra Fadnavis मनसेबाबत स्पष्टच म्हणाले, …शक्य असेल तिथे सोबत घेऊ!

991
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीत मनसेला मदत करता आली नसली तरी त्यांच्या आणि आमच्या विचारांचा मेळ जुळत आहे. त्यामुळे सरकारसोबत घेण्यात आम्हाला रस आहे आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जिथे शक्य असे तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल असा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

(हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Madhukar Pichad यांचे निधन)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना मनसे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत विचारले असताना त्यांनी मनसेचे अध्यख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत खुल्या दिलाने भाजपा महायुतीला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला चांगले यश मिळाले आहे. पण त्यांचाही पक्ष आहे. त्यांनाही निवडणूका लढवायच्या होत्या.पण विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत सामावून घेता आले नाही. म्हणून ते विरोधात लढले. प्रवाहाच्या विरोधात लढूनही त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत.

(हेही वाचा – आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र)

मनसेचे आणि विचार चांगले आहेत, आमच्या विचारांचा मेळ जुळून येत आहे. त्यामुळे त्यांना आमच्या सरकारसोबत घेण्यात रस आहेत. पण महापालिका निवडणुका म्हणून जर विचाराल तर जिथे शक्य असेल तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नमुद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.