छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजीराजेंबाबत असलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे म्हटले आहे. विकीपीडियावरील मजकुराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सायबर विभागाच्या प्रमुखांना आयजींना विकीपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विकिपिडीयावर जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी छत्रपती संभाजीराज यांच्यावरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून विकिपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
(हेही वाचा तेलंगणात Congress सरकारने ओलांडली मुस्लिम तुष्टीकरणाची परिसीमा; रमझानमध्ये मुसलमान कर्मचाऱ्यांना सवलत)
ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले गेले, या संदर्भात महाराष्ट्राच्या सायबर विभागाच्या प्रमुखांना आपण सांगितले की, तात्काळ विकिपीडिया किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या यंत्रणेशी बोलणी करावी आणि ते हटवण्यास सांगावे. जी प्रक्रिया करावी लागेल ती करावी पण अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण अशा पद्धतीने राहाणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे ते तिथून काढून टाकायला पाहिजे. या दृष्टीने कारवाईचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community