दिल्लीतील भाजपाच्या दणदणीत विजयावर CM Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; म्हणाले; दिशाभूल करणाऱ्या…

98

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाच्या (Delhi assembly Election BJP Win) सत्तेत पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान प्रसार मध्यामांना दिलेल्या प्रतिक्रियामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतील (Delhi assembly election result 2025) विजयामु्ळे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा बुरखा फाटला असून, खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा अंत झाला आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच दिल्लीत भाजपाच्या (BJP) प्रचंड आणि अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि मतदारांचे आभार मानले असून, दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणारे अजित पवार यांनीही भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. (CM Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनंतर भाजपाचा झेंडा रोवला गेला. याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. या विजयामुळे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. त्यांनी सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांची दिशाभूल करत ज्या प्रकारे राज्य केले, त्या परंपरेचा शनिवारी अंत झाला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar International Airport : अंदमानच्या पर्यटनाला नवीन आयाम देणारं पोर्ट ब्लेअरचं वीर सावरकर आंतरारष्ट्रीय विमानतळ)

निश्चितपणे हे विकासाला व मोदींवरील विश्वासाला दिलेले मत आहे. भाजपाचे सरकार दिल्लीत लोकांच्या आशा – आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी निवडणुकीत भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसवर (Congress) विशेषतः राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, लोकांनी मोदींना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. या यज्ञात एखादी समिधा आमचीही आहे. त्यात दिल्लीतील मराठी माणूस मोदींच्या पाठिशी उभा राहिला याचा मला आनंद आहे. राहुल गांधी यांना काँग्रेसचा पराभव डोळ्यापुढे दिसत होता. त्यामुळे त्यांनी कालच तशी कव्हर फायरिंग केली होती.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.