CM Devendra Fadnavis : लोकसभेत बुधवारी २ एप्रिलला वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक (Waqf Research Bill) सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आता या वक्फ संशोधन विधेयकावर (waqf amendment bill) प्रतिक्रिया देताना विरोधकांव जोरदार हल्लाबोल केला. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Bombay High Court वर काळ्या जादूची छाया? कोर्टाबाहेर सापडली लिंबू, मिरची आणि काळी बाहुली)
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
वक्फ बील पुर्णपणे पास होईल असा विश्वास आहे, सेक्युलर शब्दाचा प्रत्यय बिलातून पाहिला मिळत आहे. मुस्लिम महिलांना वक्फ बोर्डात स्थान मिळणार आहे. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. धार्मिक आस्थांच्या विरोधातही हे विधेयक नाही. मागच्या बीलामध्ये ज्या चुका होत्या, त्यामुळे जमिनी लाटल्या जात होत्या. आता ज्याची ज्याची सदविवेक बुद्धी जागृत आहेत ते या विधेयकांचं स्वागत करतील, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
(हेही वाचा – हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा)
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधक या संदर्भातील एकही पुरावा संसदीय समितीपुढे (Parliamentary Committee) आणू शकले नाहीत, जेव्हा काहीही उरत नाही त्यावेळी अशा गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी छातीवर हात ठेवून विचार केला तर लक्षात येईल की विरोधी पक्ष मताची लाचारी असल्यामुळे विरोध करत आहेत. मताच्या लांगुनचालनासाठी हे बिलाला विरोध करत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – ‘मराठी येत नसेल तर…; Ambernath मध्ये मनसे कार्यकर्त्यांचा बँक मॅनेजरला इशारा)
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते बिलाला विरोध करणार नाहीत. विधेयकाला समर्थन देतील अशी माझी अपेक्षा आहे. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्या लेव्हलचे प्रश्न विचारत जा, नाहीतर मला तुमच्या बुद्धीची कीव येते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत असून, संसदेमध्ये (Parliament) गोंधळ पाहायला मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community