Illegal Hukka Parlour आढळल्यास हॉटेल मालकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा!

57
Illegal Hukka Parlour आढळल्यास हॉटेल मालकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा!
  • खास प्रतिनिधी 

कोणत्याही उपाहारगृहात दोनदा रोखल्यानंतर तिसऱ्यांदा हुक्का पार्लर पुन्हा सुरू केल्यास उपाहारगृहाचा परवाना कायमचा रद्द करून मालकावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Illegal Hukka Parlour)

धूम्रपानास बंदी

आमदार सुनील कांबळे आणि संजय केळकर यांनी मंगळवारी २५ मार्च २०२५ या दिवशी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील अवैध हुक्का पार्लरचा विषय काढत, महाराष्ट्र सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA), २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असताना, हुक्का पार्लर चालविणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, याकडे लक्ष वेधले. (Illegal Hukka Parlour)

नोटीस देण्यात आली

या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, हॉटेल पाल्मोको, कोरेगाव पार्क, पुणे येथे अवैधरित्या तंबाखुजन्य फ्लेवर्स असलेले हुक्का सापडला. तसेच, मद्यविक्रीचा परवाना नसताना मद्यसाठा आढळून आल्याने पोलीस स्टेशन, कोरेगाव, पुणे येथे १९ जानेवारी २०२५ या दिवशी ‘सिगारेट आणि इतर तंखाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ मधील (महाराष्ट्र सुधारणा) २०१८ चे कलम ४-क, २१-क आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) नुसार नोटीस देण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. (Illegal Hukka Parlour)

(हेही वाचा – ‘पीओके’ हा भारताचा अविभाज्य भाग; United Nations मध्ये भारताने खडसावले)

दोन वर्षात १०८ गुन्हे

‘सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ मधील (महाराष्ट्र सुधारणा) २०१८ अन्वये राज्यात तंबाखुजन्य हुक्का पार्लरवर बंदी लागू करण्यात आली असून, पोलीसांमार्फत हुक्का पार्लर चालविण्यासाठी कोणताही परवाना देण्यात येत नाही. तसेच, पोलीस स्टेशन हद्दीतील शैक्षणिक संस्था, सोसायट्यांमध्ये तंबाखुजन्य पदार्थ, हुक्का यापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन, कार्यक्षेत्रात जनजागृती, कायदेशीर कार्यवाही करून या धंद्याचे समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यक्षेत्रामध्ये २०२३ ते २०२५ (फेब्रुवारी अखेरपर्यंत) या कालावधीत अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई करून २३१ आरोपींविरूद्ध १०८ गुन्हे दाखल असून रू. १.८३ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Illegal Hukka Parlour)

दुसर्‍यांदा पकडल्यास ६ महिने परवाना रद्द

फडणवीस म्हणाले की, २०१८ मध्येच अवैध हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतचा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यात अत्यावश्यक सुधारणा करण्यात येतील. यापुढे अवैध हुक्का पार्लर दुसर्‍यांदा पकडल्यास ६ महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल, तसेच तिसर्‍यांदा सापडला, तर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिला. (Illegal Hukka Parlour)

(हेही वाचा – विधानसभा उपाध्यक्षपदासाठी Anna Bansode यांचा अर्ज दाखल)

इलेक्ट्रॉनिक सिगारेटवरही बंदी

मुख्यमंत्री म्हणाले की, अवैध हुक्का पार्लर पोलिसांनी उघडकीस आणला, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही; मात्र इतरांनी अवैध हुक्का पार्लर उघडकीस आणला, तर उत्तरदायी पोलिसांवर कारवाई केली जाईल. हा गंभीर विषय आहे. हुक्का ओढणे ही फॅशन झाली आहे. काही ठिकाणी तंबाखू असते, काही ठिकाणी नसते. बरेच जण अमली पदार्थ, चिलीम ओढतात. एके ठिकाणी धाड घातल्यावर शाळेतील मुले आढळली होती. यासाठी कायदा कडक करण्याविषयी निर्देश देण्यात येतील. अलिकडील काळात इलेक्ट्रॉनिक सिगारेट दिसते, त्यावरही बंदी आहे. बर्‍याच ठिकाणी धाडी घालून त्याचा व्यवहार करणार्‍यांवर कारवाई केलेली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Illegal Hukka Parlour)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.