घरात बसणाऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे महत्त्व काय कळणार?; CM Eknath Shinde यांचा हल्लाबोल

254

जे अडीच वर्ष केवळ घरात बसले त्यांना ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम काय समजणार. या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामान्यांचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले. बदनामी करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यातील परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले की, आतापर्यंत झालेल्या शासन आपल्या दरी मध्ये सगळ्यात यशस्वी हा कार्यक्रम झाला. ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आतापर्यंत वीस कार्यक्रम झाले. 1 कोटी 84 लाख लोकांनी ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा लाभ घेतला.

(हेही वाचा Hindu : शाळेच्या बाकावर ‘जय श्री राम’ लिहिले म्हणून ख्रिस्ती शिक्षिकेने विद्यार्थ्याचा चेहरा व्हाइटनरने रंगवला; हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे कारवाई )

विरोधकांवर हल्लाबोल 

सरकारचा बोगस कार्यक्रम आहे असे काहीजण म्हणतात. अनेक लोक लाभ घेऊन गेले. जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचे महत्व असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. अडीच वर्ष घरात राहून बोगसगीरी केली त्यांनी असे म्हणणे हा लोकांचा अपमान आहे. आता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठ्या प्रमाणावर लोक या कर्यक्रमाला येत आहेत.  ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश जागा मिळाल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.