CM Eknath Shinde: “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन”, मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका रोख कुणाकडे?

253
CM Eknath Shinde: “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन
CM Eknath Shinde: “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन", मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका रोख कुणाकडे?

काही दिवसांपूर्वी (CM Eknath Shinde) लखनऊमधील २०० एकर जमीन प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishore Chaturvedi) त्याच्या इतर सहकाऱ्यांबरोबर या २०० एकर जमीनवर टाऊनशिप विकसित करणार होता. परंतु, ही संपत्ती आर्थिक गैरव्यवहार अधिनिमय २०१६ अंतर्गत जप्त करण्यात आली. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खुलासा केला आहे.

(हेही वाचा –Narayan Rane: उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार)

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. ८०० कोटींचा प्रकल्प आहे. त्याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. ही माहिती मी योग्यवेळी देईन. मी कोणावर आरोप करत नाही. सूडभावनेने, आकसापोटी वक्तव्य करत नाही. पण जी वस्तुस्थिती आहे, ती सांगतोय.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा –HSC, SSC Result: दहावी, बारावीच्या निकालाची तारिख आली समोर, बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल)

नेमकं प्रकरण काय?

प्राप्तिकर विभागाने लखनऊमधील २०० एकर मालमत्ता जप्त केली. देशातील सर्वांत मोठा हवाला ऑपरेटर असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदीची ही मालमत्ता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेव्हण्याला २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज दिल्यामुळे चतुर्वेदी चर्चेत आला होता. ज्या कंपनीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांनी कर्ज घेतले होते, त्याच कंपनीचा वापर नंदकिशोर चतुर्वेदीने २०० एकरच्या जागेवर एकात्मिक टाऊनशिप विकसित करण्यासाठी केला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटिसही जारी करण्यात आली आहे. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.