मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट, चर्चेला उधाण

133
मागील अनेक निवडणुका वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा न देता स्वबळावर निवडणुका लढवल्या, त्याचा परिणाम म्हणून दोन्ही काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडली, आता राज्यात लवकरच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, दोन वर्षांत विधानसभा आणि लोकसभा होणार आहेत. अशा वेळी राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचे सरकार स्थापन झाले, आता उद्धव ठाकरे गटाला बाजूला ठेवून राज्याच्या राजकारणाची नवी दिशा ठरवली जात आहे. बुधवारी, १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

१५ मिनिटे बंद दाराआड चर्चा 

यावेळी दोन्ही नेत्यांची 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या भेटीने राज्यात कोणतेही नवे राजकीय समीकरण निर्माण होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचं ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन पाहिले. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूत आल्यावर एक वेगळंच समाधान लाभले.  इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा ‘मेरा अब्दुल ऐसा नही…’ पोस्टवर केतकी चितळेचे प्रत्युत्तर, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.