आज म्हणजेच सोमवार १९ जून रोजी शिवसेना पक्षाचा ५७वा वर्धापन दिन आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून तसेच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासूनचा हा त्यांचा पहिला वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकाच पक्षाच्या वर्धापन दिनाचे दोन वेगवेगळ्या गटाकडून होणारे कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात “महाराष्ट्राची हास्य जत्रा” हा मनोरंजनाचा कार्यक्रमही होणार आहे. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषणही होणार आहे.
(हेही वाचा – शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी)
तर दुसरीकडे गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य भाषण होणार आहे. त्याचबरोबर ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा पक्ष प्रवेश देखील होणार असल्याची माहीती मिळते आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाकरे गटातील नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community