राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता: धरिला कॉंग्रेसचा बापू…

१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रभावी नेते आहेत. कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की कॉंग्रेसचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात येईल. एकेकाळी काँग्रेसचा सूर्य कधी मावळत नव्हता, आता कॉंग्रेसला अजून एक झटका बसला आहे. तसे त्यांना रोजच झटके बसत असतात. नापास विद्यार्थ्याला म्हणजेच राहुल गांधींना ते प्रत्येक वेळी मास्टर्सच्या परीक्षेला बसवतात आणि तोंडावर आपटतात.

एकनाथा शिंदे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कॉंग्रेसच्या पोटात पुन्हा दुखायला लागण्याची शक्यता आहे. १७ सप्टेंबर म्हणजे मोदींचा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींची जयंती या दरम्यान ’राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

काँग्रेससाठी निवडणूक जिंकण्याचं माध्यम

सामान्य नागरिकांच्या तक्रारी व अर्ज यांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी हा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच महात्मा गांधींना आपल्याकडे वळवलं आहे. म्हणजेच कॉंग्रेस इतकी वर्षे गांधींना समोर ठेवून राजकारण करत होती. महात्मा गांधी कॉंग्रेससाठी लोकांना मूर्ख बनवण्याचं आणि निवडणूक जिंकण्याचं माध्यम होतं.

काँग्रेसच्या हातून गांधी निसटले

परंतु अण्णा हजारे यांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधी भव्य आंदोलनात गांधी यांचे पोस्टर्स दिसले. अण्णा हजारे हे महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित झालेले समाजसेवक. गंमत म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते गांधींचा वापर करायचे आणि ज्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, ते अण्णा हजारे देखील गांधींना आदर्श मानतात. या आंदोलनामुळे काँग्रेसच्या हातून गांधी निसटले.

गांधी भाजपचेही झाले

नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या फोटोचा आणि एकंदर त्यांच्या तत्वाचा उपयोग स्वच्छता अभियानासाठी केला. त्यामुळे काँग्रेसच्या तळपायाची आग मस्तकात गेली. गांधी आमचे, सावरकर तुमचे असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांना गांधींना सोडायचं नव्हतं. कारण आपल्या तोंडाकडे पाहून कुणीही मते देणार नाही, याची खात्री कोंग्रेसला होती. आता महात्मा गांधी हे केवळ कॉंग्रेसचे राहिले नसून ते भाजपचे देखील झाले आहेत.

आता कोणाच्या पंक्तीत बसणार?

कॉंग्रेस या धक्क्यातून अजून सावरलेली नाही. त्यात एकनाथ शिंदे यांनी जणू अॅटमबॉम्ब लावला आणि ’राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित केला. राष्ट्रनेता म्हणजे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी. म्हणजे शिंदेंनी मोदींना गांधींच्या पंक्तीत आणून उभं केलं आहे. आता डुप्लिकेट गांधी काय करतील? ते कोणाच्या पंक्तीत उभे राहतील?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here